पोटीस्कुम – ईशान्य नायजेरियातील एका महाविद्यालयाच्या वसतीगृहात झोपलेल्या विद्यार्थ्यांवर शनिवारी मध्यरात्री दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात 50 विद्यार्थी ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
नायजेरियात महाविद्यालयावर दहशतवादी हल्ला
गुजबा या ग्रामीण भागात असलेल्या योब राज्य कृषी महाविद्यालयाचे वर्गही दहशतवाद्यांनी पेटवून दिले असल्याची माहिती विद्यालयाचे प्राध्यापक मोलिमा इदी माटो यांनी दिली. सुरक्षा रक्षक विद्यार्थ्यांचे मृतदेह शोधत असून अद्याप मृत विद्यार्थ्यांची आकडेवारी समजू शकली नाही.
या घटनेनंतर वसतीगृहातील जवळपास एक हजार विद्यार्थी बेपत्ता असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, बोको हराम या दहशतवादी संघटनेकडून ईशान्य नायजेरियामध्ये बंड पुकारण्यात आल्यामुळे या भागामध्ये सैन्य तैनात करण्यात आले आहेत. या संघटनेने आतापर्यंत जवळपास 100 नागरिकांना ठार मारले आहे.
