डॉकयार्ड दुर्घटनेप्रकरणी 7 अधिकारी निलंबित

मुंबई – डॉकयार्ड रोडवरील पालिकेच्या इमारतीखाली 61 जणांचा बळी गेल्यानंतर आता याचं राजकारण तापू लागलं आहे. सत्ताधारी शिवसेनेनं या प्रकरणाला पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत आयुक्त सीताराम कुंटेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

कुंटे हे मंत्रालयाचे एजंट आहेत, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. या सगळ्या प्रकारानंतर आज महापालिकेनं तातडीनं 7 अधिकार्‍यांना घरी पाठवलं आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर आणखी 18 अधिकार्‍यांवर चौकशी करण्याचे संकेतही दिले आहेत.