पुणे, – कोकण गोव्यासह मध्यमहाराष्ट्रात आज जोरदार पाऊस झाला. महाबाळेश्वर येथे आज सर्वाधिक 55 मीमी पावसाची नोंद झाली. पुणे शहरातही आज सकाळी पाऊस झाला. तर मराठवाडा आणि विदर्भातील काही ठराविक ठिकाणीच पाऊस झाला.
राज्यात अनेक ठिकाणी पाऊस
बंगालच्या उपसागरात नेऋत्येला पश्चिम बंगाल व ओडिशा किनारपट्टीच्या लगतच्या भागावर एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. दक्षिण-पश्चिम राजस्थान व लगतच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता दक्षिण राजस्थान व लगतच्या भागावर आहे. त्यामुळे गेल्या 24 तासात कोकण गोव्यात जोरदार पाऊस पडत आहे. हर्णे येथे 60, मंडणगड येथे 40 मीमी पाऊस झाला. तर मध्यमहाराष्ट्रातील महाबळेश्वर, खेड राजगुरूनगर येथे प्रत्येकी 20 तर विदर्भातील ब‘ारपूर येथे 30 मीमी पाऊस झाला. मराठवाड्यात पावसाच्या हल्नया एक दोन सरी पडल्या. येत्या दोन दिवसात कोकण गोव्यात अनेक ठिकाणी तर मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
पुणे शहरात गेल्या दहा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. आधून मधून पावसाच्या हल्नया एक किंवा दोन सरी पडत होत्या. मात्र, आज सकाळी शहरात जोरदार पाऊस झाला. दिवसभरात 2.5 मीमी पावसाची नोंद झाली. धरणक्षेत्रातही आज चांगला पाऊस झाला. रविवारची सुट्टी असल्यामुळे नागरिकांनी पावसात भिजत खडकवासला धरण परिसरात गर्दी केली होती. येत्या दोन दिवसात मेघगर्जनेसह शहरात जोरदार पाऊस पडेल. असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. राज्यातील प्रमुख शहरात आज दिवसभरात झालेला पाऊस (मीमीमध्ये) : पुणे 2.5, कोल्हापूर 0.3, महाबळेश्वर 55, सांगली 0.4, सातारा 2, सोलापूर 0.3, रत्नागिरी 7, पणजी 17, डहाणू 6, भिरा 5, औरंगाबाद 2 तर वाशिम येथे 4 मीमी पावसाची नोंद झाली.
