नावावर चित्रपट चालण्याचा काळ गेला – अक्षय

अक्षय म्हणाला, ’बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता की, जेव्हा फक्त हीरोंच्या नावावर चित्रपट चालायचे, परंतु तो काळ आता संपलाय. सध्या फक्त चांगलेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर तग धरु शकतात. जर तुमच्या चित्रपटाची पटकथा चांगली असेल, तर तुमचा चित्रपट नक्कीच बॉक्स ऑफिसवर जादू दाखवणार.

अनेकवेळा मोठे कलाकार घेऊनही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर पाहिजे तसं यश मिळत नाही.’ यामुळेच मी ‘वक्त’, ‘एक रिश्ता’, ‘जानवर’ हे चित्रपट केलेत.’ अक्षय आता मल्याळम चित्रपट ’पोक्किरी राजा’चा रिमेक ’बॉस’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाविषयी बोलताना तो म्हणाला की, ‘जेव्हा मी हा चित्रपट पाहिला तेव्हा मला तो खूप आवडला. या चित्रपटात मनोरंजन, विनोद तसेच अॅक्शनची १२ दृश्य आहेत.

एका कुटुंबातील दोन भाऊ तसेच त्यांच्या वडिलांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे, आणि माझे आणि माझ्या वडिलांचे नाते खूपच चांगले होते. तसेच मुलगा आरव बद्दल बोलताना अक्षय म्हणाला, ‘आमच्यात खूप चांगलं नातं आहे, त्याला माझे सर्व चित्रपट आवडतात. त्याच्यासाठी मी सुपरमॅन असून त्याला माझे अॅक्शन चित्रपट जास्त आवडतात. ’ तर ‘बॉस’मध्येही अनेक अवघड अॅक्शन दृश्यं असल्याचंही अक्षयनं यावेळी सांगितलं.