मुंबईत रेव्ह पार्टीचा भांडाफोड, ३५ जणांना अटक

मुंबई: मुंबईतील ओशिवरा परिसरात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीचा पोलिसांनी भांडाफोड केला. ओशिवरातील चीज मोई पबमध्ये ही रेव्ह पार्टी सुरु होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईत ३५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये चार महिला, एक अमेरिकन आणि एक जर्मन नागरिकाचा समावेश आहे.

ओशिवरातील चीज मोई पबमध्ये शुक्रवारी रात्री रेव्ह पार्टी आयोजीत करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याहनुसार पोलिसांनी सापळा रचून या पबवर छापा टाकला. त्यावेळी पबमध्ये रेव्ह पार्टी सुरु होती. यावेळी पोलिसांनी चार महिलासह ३५ जणांना ताब्यात घेतले आहे. या सर्वांना तपासणीसाठी कुपर रुग्णालयात नेण्यात आले आहे.

पोलिसांना या पबमधून काही संशयास्पीद वस्तू याठिकाणी मिळाल्या आहेत. ज्यावरुन या पार्टीत अंमली पदार्थांचे सेवन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी शनिवारी सकाळी उशीरपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.