मुंबई – चिंटू शेख गोळीबार प्रकरणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. नारायण राणे यांच्याविरोधात केलेली अब्रु नुकसानीची याचिका शमीम उर्फ चिंटू शेख याने मागे घेतली आहे. त्यांच्या दैनिकामध्ये आलेल्या बातम्यांमध्ये वापरलेल्या तडीपार, वॉटेड आणि अन्य अपशब्दांनी आपली बदनामी झाल्याचे सांगत राणे पब्लिकेशन, प्रहार आणि राणेंविरोधात शेखनं विक्रोळी मेट्रोपॉलिटन कोर्टात धाव घेतली होती. पण, आता मात्र आपण याचिका बिनशर्त मागे घेतल असल्याचं प्रतिज्ञापत्र चिंटू शेखनं दाखल केले आहे.
चिंटू शेखची राणेंविरोधातली याचिका बिनशर्त मागे
यासाठी आपल्यावर कुणाचा दबाव नसल्याचेही त्याने या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
23 सप्टेंबर 2009 मधील हे प्रकरण आहे. हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले होते. सीबीआयने नितेश राणे यांना क्लिन चिट देत क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. चिंटू शेख याच्यावर 23 सप्टेंबर, 2010 रोजी गोळीबारही करण्यात आला होता. ‘स्वाभिमान‘ संघटनेच्या कार्यालयात आपल्यावर नितेश राणे यांनी गोळीबार केल्याचा दावा शेखने त्यावेळी केला होता.
