पुणे, – भारतीय तरुण हे प्रचंड बुद्धिमत्ता आहे त्याच बरोबर त्यंानी कौशल्य विकसनाच्या दृष्टीने योग्य पाऊले उचलल्यास, भारत हा जगाला प्रशिक्षित मनुष्यबळ पुरविणारे केंद्र होऊ शकेल, असे मत ’नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सी (एनएसडीए)’ चे अध्यक्ष पद्मभूषण डॉ. सुब‘मण्यम रामादोराई यांनी व्यक्त केले.
’पुणे इंटरनॅशनल सेंटर’ (पीआयसी)च्या दुसर्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक‘मात ‘कौशल्य विकसन-काळाची गरज’ या विषयावर डॉ. रामादोराई बोलत होते. यावेळी डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ पत्रकार आणि पीआयसीच्या कार्यक‘म समितीचे अध्यक्ष दिलीप पाडगांवकर, डॉ. शां.ब. मुजुमदार उपस्थित होते. भारतामध्य ेकौशल्य विकसन करणे, हे आपले ध्येय असल्याचे सांगून, डॉ. रामादोराई म्हणाले, केवळ 7 टक्केलोकसं‘याच रोजगारामध्ये संघटीत आहे, तर केवळ 2.4 लाख प्रशिक्षणार्थींना दरवर्षी नोकरी मिळते आणि केवळ 25 टक्के अभियंत्यांकडेच नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक कौशल्य असते. त्यामुळे कौशल्य विकसन हे आणि हीच एकमेव सध्याची देशापुढची गरज आहे. खाजगी क्षेत्रामधून यासाठी नेतृत्व पुढे यायला हवे आणि देशातील खर्च होणारा प्रत्येक रुपयाचा उपयोग हा कौशल्य विकसनासाठी व्हायला हवा. पुणे केवळ शिक्षणाचेच नव्हे, तर छोट्या आणि मध्यम उद्योगांचे माहेरघर असून, कौशल्य विकसनासाठी पुणे हे महत्त्वाची भूमिका बजावू शकेल. यासाठी पुण्यातील विद्यापीठानी पुढाकार घ्यायला हवा.
डॉ. माशेलकर म्हणाले, मोठ्या विचारांना कृतीशिवाय अर्थ नसतो. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला अंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारेडॉ. रामादोराई हेकृतीशीलतेचेमोठेउदाहरण आहे. त्यांनी भारतामध्ये कौशल्य विकसनाला मोठी चालना दिली आहे. प्रशांत गिरबाने यांनी कार्यक‘माचे सूत्रसंचालन केले.