पेशवाईतील वैभवासह पुन्हा जिवंत होणार शनिवारवाडा

पुणे, -छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळात खैबरखिंड ते बंगाल या भागातील मराठी साम‘ाज्याचे मु‘य ठिकाण बनलेल्या शनिवारवाड्याचे त्यावेळचे रूप पुन्हा उभे करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. कला दिग्दर्शक देसाई यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याचे स्थायी समितीने ठरविले आहे.

मराठा साम्राज्याचे पंतप्रधान अर्थात पेशवे यांचे निवासस्थान व कार्यालय अठराव्या शतकात शनिवारवाड्यात होते. या वाड्याच्या उभारणीस 10 जानेवारी 1730 मध्ये सुरवात झाली. वास्तुशांती 22 जानेवारी 1732 रोजी झाली. त्या वेळी संपूर्ण शनिवार वाड्याच्या बांधकामाला 16 हजार 10 रुपये इतका खर्च आला होता. हा वाडा 1828 मध्ये लागलेल्या आगीत संपूर्ण भस्मसात झाला. त्यानंतर 1919 मध्ये संरक्षित स्मारक म्हणून शनिवारवाड्याची नोंद झाली.

शनिवारवाडा पूर्वीच्या दिमाखात उभारावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. त्यानुसार महापालिकेने सकारात्मक सुरुवात केली असून स्थायी समितीचे सदस्य हेमंत रासने यांनी या संदर्भातील ठराव दाखल केला. तो मान्य केल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी सांगितले. सध्या या वाड्याची देखभाल पुरातत्त्व विभागाकडे आहे. वाड्याचे मूळ स्वरूप जसे होते त्याप्रमाणे आवश्यक परवानगी घेऊन बांधकाम करण्यात यावे. त्यासाठीचा आराखडा तयार करण्यासाठी देसाई यांची स‘ागार म्हणून नेमणूक करून त्याकरीता लागणारी आर्थिक तरतूद करण्यात यावी व शनिवारवाडा या ऐतिहासिक स्थळाची ओळख संपूर्ण जगाला होईल, अशी वास्तू उभारावी, असा ठराव रासने यांनी मांडला होता. तो सर्वानुमते मान्य करण्यात आला आहे, असे तांबे यांनी सांगितले.
——————————————–