
बिजिंग- उसागी’ या चक्रीवादळाने चीन व हॉँगकॉँगला जोरदार तडाखा दिला आहे. यामुळे समुद्रात उंचच उंच लाटा उसळल्या आणि हवाई वाहतुकीवर परिणाम झाला. उसागी’ हे आशिया खंडातील सर्वात मोठे चक्रीवादळ असण्याची शक्यता आहे. या वादळामुळे हवाई वाहतूक विस्कळीत झाली असून शाळांना रजा दिली आहे. ग्लुआनडॉँग प्रांतातील हुलाई आणि हुडॉँग शहरांना वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. आठ हजार बोटींना बंदरात परतण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ग्लुआनडॉँग प्रांतात चीनचे मोठे अणुऊर्जा प्रकल्प आहेत. त्यामुळे सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वा-यामुळे फुजिआन आणि तैवान दरम्यानची जल वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ग्लुऑनडॉँग, हॉँगकॉँग, मकाऊ येथे जाणारी विमान सेवा चीनने बंद ठेवली आहे. फुजिआन प्रांतात वीज पुरवठा करणा-या वाहिन्या तुटल्याने एक लाख 70 हजार घरांचा वीज पुरवठा खंडित झाला. वीज वाहिन्या दुरुस्त करण्याचे काम वेगाने सुरू आहे
