देवगिरी एक्स्प्रेसवर दरोड्याचा प्रयत्न; आठ जणांना अटक

जालना: जालन्यातील परतूर रेल्वेतस्टेशनजवळ देवगिरी एक्स्प्रेसवर रविवारी रात्री दरोड्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी आठ दरोडेखोरांना पकडले असून त्यांना चौकशीसाठी औरंगाबाद पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे.ही घटना जालन्यातील परतूर स्टेशनजवळ रविवारी रात्री १०.३० ते ११ च्या दरम्यान घडली.

आठ दरोडेखोरांनी मिळून देवगिरी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना मारहाण करून लूटण्याेचा प्रयत्नड केला. मात्र, सतर्क असलेल्या स्थानिक पोलिसांनी आरपीएफच्या जवानांच्या मदतीने दरोडेखोरांना जेरबंद केले. मात्र दरोडेखोरांच्या हल्ल्यात आरपीएफचे दोन जवान जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.

दरम्यान,अटक करण्यात आलेल्या सर्व आठ दरोडेखोरांवर परतूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अधिक चौकशीसाठी औरंगाबाद पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे.