पुढील वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट विदेशी सिनेमाच्या श्रेणीत ज्ञान कोरेया यांच्या ‘दि गुड रोड’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गुजराती सिनेमाची निवड करण्यात आली. याची घोषणा निवड समितीचे अध्यक्ष गौतम घोष यांनी केली. ‘दि लंच बॉक्स’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘इंग्लिश विंग्लिश’, मल्याळी सिनेमात ‘सेल्युलॉईड’ आणि ‘विश्वररूपम’ या सिनेमांना मागे टाकून ‘दि गुड रोड’ने ऑस्करसाठी नामांकन मिळविले आहे. ही निवड करण्यापूर्वी ज्युरींना पाच तास चर्चा केली.
‘दि गुड रोड’ या गुजराती सिनेमात कच्छ येथे सुटी घालविण्यासाठी आलेल्या एका कुटुंबातील हरविलेल्या व नंतर सापडलेल्या एका मुलाच्या कथेतून भारताचे दर्शन घडविण्यात आले आहे. ४२ वर्षीय ज्ञान कोरेया यांचा हा पहिलाच सिनेमा असून त्यांनी श्यामजीभाई या ट्रकचालकासारख्या स्थानिक लोकांना आपल्या चमूत सामील केले आहे. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाद्वारे निर्मित या सिनेमात केवळ कात्रोदिया या मुलाने आदित्यची मुख्य भूमिका तर सोनाली कुलकर्णी आणि अजय गेही हे आदित्यचे पालक आहेत.
दि गुड रोड’ या गुजराती सिनेमाची पुढील वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट विदेशी सिनेमात निवड झाल्या ने या सिनेमात काम करणारी मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी खूष आहे. तिने अभिनय केलेला हा सिनेमा ऑस्कर पुरस्कारासाठी निवडला गेल्याने सर्वांचे याकडे आता लक्ष लागून राहिले आहे. या सिनेमाची निवड करण्यापूर्वी ज्युरींना पाच तास चर्चा केली होती.