दामिनी सामुहिक बलात्कार ‘क्राईम पेट्रोल’मध्ये

नवी दिल्ली: समाजात घडत असलेल्या गुन्ह्यांवर आधारीत कार्यक्रम ‘क्राईम पेट्रोल दस्तक’मध्ये आता दिल्लीच्या वसंत विहार भागात झालेल्या ‘दामिनी’ सामुहिक बलात्काराचा एपिसोड दाखवण्यात येणार आहे. या एपिसोडमध्ये दामिनीवर झालेल्या अत्याचारापासून तर दामिनीला कोर्टात न्याय मिळेपर्यंतच्या प्रत्येक घटनेला गुंफण्यात आले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, शुक्रवारी ‘दामिनी’ च्या आरोपींवर शिक्षेची सुनावणी झाल्याच्या एक आठवड्यानंतर हा शो प्रसारित केला जाईल. दरम्यान, या खटल्याची सुनावणी येईपर्यंत ब्रॉडकास्टींग कंटेंट कंप्लेंटस् काऊंसिलने (बीसीसीसी) ने या एपिसोडच्या प्रसारणावर बंदी आणली होती.