बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर शनिवारी ३३ वर्षाची झाली आहे. तिच्यार चाहत्यानकडून ३३ वा वाढदिवस उत्सा हात साजरा केला जात आहे. सैफ अली खानशी लग्न झाल्यानंतर करिनाचा हा पहिलाच वाढदिवस आहे. छोटे नवाब सैफ अली खान आपल्या बेगमसाठी लंडनमध्ये शानदार बर्थ डे पार्टी आयोजित करणार आहे, यामध्ये फक्त जवळचे मित्रच सहभागी होणार असल्याेची माहिती सुत्रांनर दिली.
सध्या अभिनेत्री करिना कपूरची गणना बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. ‘रिफ्युजी’ या सिनेमातून १३ वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी करिना आज या स्थानावर पोहोचली आहे. २००० साली ‘रिफ्युजी’ सिनेमाद्वारे तिने कारकर्दीची सुरुवात केली. या सिनेमाने फारशी कमाल केली नसली तरी तिला बेस्ट फिमेल डेब्यूचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता.
तिने ‘चमेली’, ‘देव’ आणि ‘ओमकारा’ सारख्या सिनेमातील तिच्या अभिनयाने उत्तर दिलं. त्यानंतर तिने ‘जब वी मेट’, ‘३ इडियट्स’ सारखे हिट सिनेमे दिले. त्यासोबतच तिचा बहूचर्चीत व आव्हानात्मक असा हिरोईन हा सिनेमा हिट ठरला.