विनयभंगाच्या प्रकरणाचा २१ दिवसात निकाल

वर्धा : जलदगती न्यायालयातही एवढ्या वेगात काम होत नाही, तिथे वर्ध्याच्या न्यायालयाने सर्वांसाठी एक आदर्श घालून दिला असून केवळ २१ दिवसात आरोपीला शिक्षा सुनावण्याात आली आहे. एका महिलेच्याल विनयभंगाच्या प्रकरणाचा निकाल वर्धा येथील प्रथमश्रेणी न्यायालयाने फक्त २१ दिवसात दिला आहे. या प्रकरणातील आरेापीला तीन वर्षाची शिक्षा सुनावण्या त आली आहे. आहे.

मोरेश्वर सोनवणे असे सजा झालेल्यार आरोपीचे नाव आहे. कारंजा तालुक्यात काजळी येथील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रकरणी प्रथमश्रेणी न्यायाधीश निलेश मावतवाल यांनी आरोपीला शिक्षा सुनावली. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद २८ ऑगस्ट रोजी झाली होती. आरोपी मोरेश्वर सोनवणे याला तीन वर्षांचा कारावास आणि दोन हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पीडित महिला रात्री आठच्या सुमारास आपल्या घरात झोपलेली असताना, आरोपी मोरेश्वरने घरात प्रवेश करून तिचा विनयभंग केला. कारंजा तालुका पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांनी अवघ्या चार दिवसात तपास पूर्ण करून दोन सप्टेंबर रोजी न्यायालयात आरोपपत्र ठेवले.

न्यायालयाने आरोपपत्र दाखल करून घेतल्यावर खटल्याच्या सुनावणीत सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद पू्र्ण झाल्यानंतर म्हणजे १९ सप्टेंबरला या प्रकरणाचा निकाल देण्यात आला.