जमात- ए-इस्लामी’ च्या अब्दुल कादर मुल्लाला फाशीची शिक्षा

ढाका – 1971 युद्धात देशविरोधी कारवाया केल्याच्या प्रकरणात जमात-ए-इस्लामीचा अब्दुल कादर मुल्ला (65) याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेला सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

स्वातंत्र्ययुद्धातील दोषींवर खटले चालवण्यासाठी स्थापन केलेल्या न्यायालयाने त्यास जन्मठेप दिली होती. त्यानंतर सरकारने कायद्यात बदल करून त्याच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली.

मीरपूरचा कसाई अशा नावाने कुख्यात असलेला मुल्ला याच्यावर 1971 च्या युद्ध काळात देश विरोधी कारवाया केल्याचा आरोप होता. तो सिद्ध झाला. जमात-ए-इस्लामीला 1971 मध्ये बेकायदा म्हणून जाहीर करण्यात आले होते. तो संघटनेचा सरचिटणीस होता.