गोव्यात भटकळची बॉम्बची फॅक्टरी

पणजी – राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) या यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी गोव्यातल्या अंजुना या गावी बॉम्ब तयार करण्याचे साहित्य मोठ्या प्रमाणावर हस्तगत केले. एका मोठ्या वाड्यामध्ये हे सारे साहित्य त्यांन सापडले. यासीन भटकळ याने या घराचा वापर केला होता. बॉम्ब तयार करण्यासाठी केला होता असे त्यांना आढळले आहे. जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये काही बाटल्या आणि ऍसिड सापडले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे.

इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्यांनी या घराचा वापर आपल्या मुक्कामासाठी केला होता. असे आता आढळले असल्याचे पर्रीकर म्हणाले. यासीन भटकळ आणि हड्डी या दोघांच्या तपासातून बर्‍याच नव्या गोष्टी कळत आहेत. अंजुना गावातील वाडा ज्ञानेश्‍वर चारी यांनी भटकळला भाड्याने दिला होता असे आढळून आले आहे. हिवाळ्याचे दिवस संपले की भटकळ आणि कंपनी या ठिकाणी येत असे आणि बॉम्ब तयार करत असे. असे अधिकार्‍यांनी सांगितले.

यापुढे सुरक्षिततेचा उपाय म्हणून भाड्याने घरे देणार्‍या घरमालकांचे पत्ते आणि हमीपत्रे घेतली जातील. कोणालाही ओळखीचे पुरावे न घेता भाड्याने घरे देणार्‍या मालकांवर कारवाई केली जाईल भाड्याने राहणार्‍या लोकांचा दहशतवादी संघटनांशी संबंध असेल तर त्यांना भाड्याने घर देणार्‍या मालकांचाही त्या संघटनांशी संबंध आहे असे गृहित धरले जाईल असे पर्रीकर म्हणाले.