आयझोल – मिझोरम-आसाम बॉर्डरवरील तलवंग नदीच्या किनारी असलेली 100 घरे अतिवृष्टीमुळे वाहून गेली आहेत. मागील दोन आठवड्यांपासून याठिकाणी पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तलवांग नदीला पूर आल्याची माहिती कोलासीब आपत्कालीन कक्षाकडून देण्यात आली आहे. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिझोरमला पुराचा तडाखा
तलवंग ही मिझोरममधील सर्वात मोठी नदी आहे. अतिवृष्टीमुळे या नदीला पूर आला आहे. नदीकिनारी संरक्षक भिंत नसल्याने पुराचे पाणी थेट नागरी वस्तीत घुसले. नदी किनारी असलेली 100 घरे वाहून गेली असून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
