जपानमध्ये वयोवृध्दांची रेकॉर्ड ब्रेक संख्या

टोकियो – वयाची पासष्ठी ओलांडलेल्या व त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांनी जपानच्या लोकसंख्येचा महत्वाचा हिस्सा व्यापल्याचे २०१० साली झालेल्या जनगणनेवरून स्पष्ट झाले असून जपानने वयोवृध्द नागरिकांच्या संख्येचे रेकॉर्ड केले आहे. येथे ज्येष्ठांची संख्या ८६ दशलक्षांवर पोहोचली आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण १.१२ दशलक्षांनी अधिक आहे.

जनगणनेवरून समोर आलेल्या आकडेवारीनुसार दर चार नागरिकांमध्ये १ ज्येष्ठ नागरिक असे हे प्रमाण आहे. वर्ल्ड वॉर सेकंड नंतर जपानमध्ये जन्मदर विलक्षण वाढला होता त्याचाच हा परिपाक असल्याचे जाणकारांचे मत आहे.जपानच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन अॅन्ड सोशल सिक्युरिटी रिसर्च नुसार २०३५ पर्यंत दर ३ नागरिकांमध्ये १ असे ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण होण्याची शक्यता आहे.

ज्येष्ठ नागरिकांत पुरूषांची संख्या १३.६९ दशलक्ष असून ती पुरूष लोकसंख्येच्या २२.१ टक्के इतकी आहे. महिलाची संख्या १८.१८ दशलक्ष इतकी असून हे प्रमाण २७.८ टक्के इतके आहे. मात्र यातील २७.९ टक्के पुरूष व १३.२ टक्के महिला आजही जपानमध्ये कामगार म्हणून कार्यरत आहेत असेही सांगितले जात आहे.