बॉम्बस्फोटाचा कट उधळून लावला

नवी दिल्ली : येत्या‍ काही दिवसांत इंडियन मुजाहिद्दीनने बॉम्बस्फोटाचा कट रचाला होता: मात्र त्यांचा हा कट पोलिसांच्या सर्त‍कतेमुळे उधळून लावण्यात आला. मंगलोर आणि हैदराबादेत ९० जिवंत बॉम्ब हस्तगत करण्यात गुप्तचर यंत्रणांना यश आले आहे. त्यामुळे आगामी काळातील मोठे संकट यामुळे टळले आहे.

यासीन भटकळला काही दिवासांपूर्वी भारत-नेपाळ सीमेलगत बिहारमध्ये अटक करण्यात आली होती. त्यावच्यारकडे या प्रकरणाची चौकशी केली असता त्यांनी मंगलोर आणि हैदराबादेत येथील स्थीळांची माहिती दिली होती. त्यारसोबतच दहशतवादी संघटनेचा मुख्यम आरोपी अब्दुल्ला अख्तर यांनी या ठिकाणांची माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे. यासीन भटकळने दिलेल्या ठिकाणांवर छापे मारल्यानंतर हे ९० जिवंत बॉम्ब हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

यासीन भटकळला जेरबंद केल्यानंतर अनेक दहशतवादी कारवायांची पोलखोल होईल, असे म्हटले जात होते. ते आता खरे ठरले असून त्याच्या चौकशीत अनेक गोपनीय ठिकाणची माहिती पुढे येणार आहे. त्यामुळे आगामी काळात त्या‍च्याकडून गुप्तचर यंत्रणा कसून चौकशी करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.