जपानला मान्या वादळाचा तडाखा

टोकियो – मध्य जपानला सोमवारी सकाळी मान्या वादळाचा तडाखा बसला असून टोकियो आणि परिसराकडे सरकत असलेल्या या वादळामुळे या भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला गेला आहे. मागच्या वेळी आलेल्या प्रलयंकारी त्सुनामीमध्ये मोठेच नुकसान झालेल्या फुकुशिमा अणु उर्जा केंद्रावर या वादळाचा परिणाम झाला असून येथील शेवटचा रिअॅक्टरही सुरक्षिततेसाठी बंद केला गेला असल्याचे समजते.

मान्या वादळामुळे ताशी १६२ किमी वेगाने वारे वाहात आहेत. शिगा भागात एक महिला बेपत्ता झाली असून अन्य भागात किमान सहा जण जखमी झाले असल्याचे सांगितले जात आहे. उत्तर- उत्तरपूर्वेकडे असलेले हे वादळ राजधानी टोकियोच्या दिशेने सरकत आहे त्यामुळे तेथे मुसळधार पावसाला सुरवात झाली असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना केल्या गेल्या आहेत.