जीनिव्हा- सीरियामधील रासायनिक अस्त्रे नष्ट करण्यासाठी आवश्यक असलेल्या आराखड्यासंदर्भातील एका करारावर अमेरिका व रशिया यांच्यात सहमती झाली असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी व रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅव्हरोव्ह यांनी शनिवारी सांगितले.

सीरियाच्या समस्येबाबत सतत तीन दिवस केलेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर हा तोडगा निघाला असल्याची माहिती त्यांनी दिली. या करारामध्ये एका वेळापत्रकाचा आणि सीरियाने दिलेल्या नियमावलीचे कशा प्रकारे पालन करावे आणि त्यांचे पालन करण्यामध्ये अपयशी ठरल्यास त्यांच्यावरील लष्करी कारवाईला अनुमती देण्याच्या ठरावाची सुरक्षा परिषदेकडे मागणी करण्याच्या मुद्दयांचा समावेश आहे.
जॉन केरी यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री व त्यांच्या तज्ज्ञांच्या पथकांनी एकमेकांशी विचारविनिमय करून सीरियाकडे सध्या किती शस्त्रसाठा आहे त्याचे मूल्यमापन केले व सर्व रासायनिक अस्त्रे सीरियाने नष्ट केली पाहिजेत, असा ठराव केला असल्याची माहिती केरी यांनी दिली.