जपान करणार भारताला ऊर्जेसंदर्भात मदत

टोकियो – जागतिक स्तरावर चीनचा वाढता दबदबा पाहता जपान आणि भारत उर्जा क्षेत्राबाबत आपले संबंद दृढ करण्याच्या विचारात आहे, असे अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार स्पष्ट होत आहे.

जपान भारतामध्ये फक्त वीजघर उभारणी आणि कोळश्याची गुणवत्ता सुधारण्याची पद्धतीच देणार नाही तर अन्य देशांकडून तेल व वायू ब्लॉक खरेदी करण्यासाठीसुद्धा तो भारताबरोबर काम करणार असल्याचे सांगितले जात आहे. कोळश्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी भारतामध्ये वॉशरीज स्थापित करण्यात येणार आहेत.

हा अणू उर्जेसंदर्भात अजूनही काही मुद्यांवर दोन्ही देशांमध्ये काही अडचणी असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. यासाठी पुढील रणनीती तयार करण्यासाठी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये डिसेंबर 2013 नंतर बैठका घेतल्या जाणार असल्याची शक्यता आहेत .

जपान भारताला वीज उत्पादन करताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सुद्धा सहयोग करणार असल्याचे समजते. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आगामी काळात अजूनही चांगले होणार असे दिसत आहे. त्याचबरोबर जपानच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा आपल्याला होऊ शकतो.