अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोनाक्षीची ओळख आता दोस्तासाठी जीव देणारी अभिनेत्री म्हणून झाली आहे. तिला नेहमीच सरप्राइज देणे आणि घेणे आवडते. नुकताच तिने मेकअप आर्टिस्ट नीलेश परमारच्या बर्थडेला चांगले गिफट देवून त्याला सरप्राइज केले.
गेल्या काही दिवसांपासून शूटिंगमध्ये बिजी असल्याच्या कारणावरून अभिनेत्री सोनाक्षीला गणपती उत्सक म्हणावा तसा साजरा करता आला नाही. मेकअप आर्टिस्ट नीलेशचा बर्थडे त्याच दिवशी साजरा करण्यात येणार होता. नीलेश पण तिच्या समवेत असल्याने घरच्यासोबत त्याला गणपती उत्सव साजरा करता येत नव्हता. मात्र त्यासाठी सोनाक्षीने तिला एक सरप्राइज देण्याचा प्लॅन आखला.
सूत्राने दिलेल्यामाहितीनुसार सोनाक्षी नीलेशच्या वैनिटी वैनमध्ये गेली व तिने व्हॅन बलून्सने सजवली. त्यासोबतच मेकअप थीम आणि केक देखील मागविला. सोनाक्षी तसे पाहिले तर टीम सोबत खूपच क्लोज आहे. नीलेश शूटच्या वेळी सोनाक्षीची खूपच करमणूक करीत असतो. त्यामुळे सोनाक्षी नीलेशला चांगला दोस्त समजते. नीलेशला वाढदिवसानिमित सोनाक्षीने दिलेले हे गिफट खूप आवडले. गणपती उत्सव साजरा न करता आल्याने नाराज झालेला निलेश सोनाक्षीकडून सरप्राइज मिळाल्याने आंनदीत झाला होता.