नवी दिल्ली- गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केल्याने ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या मनात अजिबात राग नाही, असे स्पषटीकरण लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केले आहे. या संदर्भात स्वमराज यांनी आडवाणी यांची नुकतीच भेट घेतली. आडवाणी हे नाराज नसल्यापचा दावा भाजपच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी केला आहे.
गेल्या् काही दिवसांपासून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषीत केल्यातनंतर पक्षात दुफळी निर्माण झाल्याच्या बातम्या या अफवा आहेत, असे सांगत त्याचा त्यांनी इन्कार केला. सुषमा स्वराज, अनंत कुमार आणि पक्षाचे प्रवक्ते बलबीर पूंज यांनी लालकृष्ण आडवाणी यांची भेट घेतली. त्यांच्यातील बैठक तब्बल दोन तास चालली, पण या चर्चेत मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचा विषयसुद्धा आला नाही, असेही स्वराज यांनी स्पष्ट केले.
दरम्याधन शनिवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह मुंबईत होते. मोदी यांच्या निवडीवरून लालकृष्ण आडवाणी नाराज नाहीत असे स्पष्ट करतानाच आडवाणी हे आमचे नेते, मार्गदर्शक आणि कुटुंबप्रमुख आहेत. त्यामुळे कुटुंबप्रमुखाच्या नात्याने आम्हाला जाब विचारण्याचा आणि फटकारण्याचा त्यांना अधिकारच आहे, असे राजनाथ यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.