वॉशिग्टन – भारताने इराण मधून केली जात असलेली तेल आयात बंद करावी अशी सूचना अमेरिकेतील रिपब्लीकन पक्षाचे वरीष्ठ सिनेटर जिम रिश यांनी केली आहे. इराण हा पश्चिम आशियातील अशांततेस कारणीभूत आहे व या देशाकडून भारत तेल आयात करत राहिला तर सर्व जगच संकटात सापडण्याची शक्यता असल्याचे रिश यांचे म्हणणे आहे.
अमेरिकेने भारतावर जे निर्बध लादले होते त्यातून भारताला जूनमध्येच सूट दिली गेली आहे. अमेरिका इराण वर त्यांनी त्यांचा अणु कार्यक्रम सोडावा यासाठी दबाव टाकत आहे व अमेरिकेच्या या प्रयत्नांत भारताची सहभागी होण्याची खरोखरीच इच्छा असेल तर त्यांनी तेल आयात अन्य देशांतून करावी असे रिश यांचे म्हणणे आहे. भारत कांही दिवस तेल आयात कमी केल्याचे सांगत आहे मात्र ती केवळ कमी करून चालणार नाही तर बंदच केली पाहिजे अशी सूचना जिम रिश यांनी केली आहे.