
मुंबई – बॉलिवूडमधील सर्वाधिक प्रभावशाली जोडी म्हणून ओळख असलेल्या अमिताभ आणि जया बच्चन यांना शांततेत, कुटुंबापासून दूर, मित्रमंडळींपासून दूर राहावेसे वाटू लागले असल्याची वार्ता आहे. फ्रान्सची राजधानी आणि फॅशन आणि रोमान्ससाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या पॅरिस शहराची दोघांनाही ओढ आहे. दोन वर्षांपूर्वी लग्नाचा वाढदिवस साजरा करताना अमिताभने जयाला फ्रान्स कंट्रीसाईड आणि पॅरिसची सफर एकमेकांच्या सहवासात करण्याचे आश्वासन दिले होते आणि ते आता त्यांनी पुरे केले आहे असे समजते.
