सिरीयावर हल्याची शक्यता सध्या टळली

सिरीया संकटाबाबत देशवासियांना संबोधित करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सिरीयावर अमेरिका जमिनीवरून लगेच हल्ला करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सिरीया क्रायसिस बाबत रशिया व आंतरराष्ट्रीय स्तरावर चाललेल्या चर्चेला आणखी थोडा वेळ दिला जावा म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे ओबामा यांचे म्हणणे आहे. याचाच अर्थ असा की सिरीयावर दाटलेले युद्धाचे ढग थोडे पांगले आहेत.

रशियाने सिरीयाला रासायनिक शस्त्रे आंतरराष्ट्रीय नियंत्रणात सोपवावीत असा प्रस्ताव दिला होता व त्याला सिरीयाने संमती दर्शविली आहे. या संदर्भात ओबामा यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र सिरीयाने आपला शब्द पाळला नाही तर सिरीयावर अमेरिका हल्ला चढवेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान अमेरिकी काँग्रेसने सिरीयावरील हल्लयासंबंधीच्या सादर केलेल्या प्रस्तावावरील मतदान पुढे ढकलले आहे. हे मतदान कदाचित ओबामा यांच्या प्रस्तावाच्या विरोधात जाण्याची भीतीही जाणकार व्यक्त करत होते. मात्र ओबामा प्रशासनाच्या सिरीया हल्ला प्रस्तावाला फ्रान्स, जर्मनी आणि चीन यांनी मान्यता दर्शविली होती.