कसदार आणि उत्तम अभिनयाने बॉलीवूड तसच हॉलीवूड मध्ये झळकलेल्या इरफान खानने आणखी एक प्रगतीचा पाऊल टाकलं आहे. उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेता इरफानने निर्मिती क्षेत्रात उतरला आहे. २० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या “लंचबॉक्स” या चित्रपटाचा तो प्रोड्युसर आहे. याबाबत इरफान म्हणाला, प्रोड्युसर म्हणून मी जरी आता पुढे आलो असलो तरी मी माझा अभिनय सुरुच ठेवणार आहे. मला अजून बऱ्याच प्रकारच्या भूमिका करायचा आहे. त्यात काही विनोदी रोमांटीक तर स्पोर्टस स्पिरीटच्या सुद्धा आहेत. त्यामुळे अभिनया सोबत दर्जेदार आणि वेगळ्या धाटणीच्या चित्रपट निर्मितींचा मी प्रयत्न करणार आहे.
दिग्दर्शक रितेश बत्राचा ‘डब्बा’ (द लंच बॉक्स) या पहिल्याच चित्रपटाद्वारे इरफानने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे. त्याचबरोबर यंदाच्या लंडन चित्रपट महोत्सवामध्ये ‘डब्बा’(द लंच बॉक्स) ची चव चाखवण्यासाठी सज्ज होत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसत आहे. करण जोहरच्या ‘डर मोशन पिक्चर्स’ ची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाकडे सगळ्यांचेच लक्ष्य लागले आहे. यावर इरफान म्हणतो, करणने या सिनेमाला प्रेझेंट करण्याचा निर्णय योग्य म्हणावा लागेल. यात फक्त प्रसिद्धीचा समावेश नाही तर एक प्रकारचं वेगळे पण आहे. या चित्रपटात कोणताही ग्लॅमर्स चेहरा नाही पण मूळ कथा खूप रंजक आहे. त्यामुळे नक्कीच हा वेगळा प्रयोग प्रेक्षकांना पहायला आवडेल असा विश्वास इरफानने व्यक्त केला आहे.