युएस ओपनमध्ये नादाल दुसर्‍यांदा अजिंक्य

न्यूयॉर्क – स्पेनच्या राफेल नाडालने सर्बियाच्या नोवाक जोकोविचला हरवून अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे दुसर्‍यांदा विजेतेपद पटकावले. नाडालने यापूर्वी 2010 मध्ये अमेरिकन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.नाडालने जोकोविचचा 6-2, 3-6,6-4, 6-1 असा सरळ पराभव केला.

नाडाल-जोकोविच हे दोघेही कारकिर्दीत 37 वेळा, तर ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत सहाव्यांदा समोरासमोर आले होते. नाडालच्या कारकिर्दीतील हे दुसरे यूएस ओपनचे विजेतेपद आहे, तर तेरावे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. रोजर फेडरर 17 ग्रँडस्लॅम जिंकून पहिल्या स्थानावर आहे तर अमेरिकेचा पीट सैंप्रास दुसर्‍या क्रमांकावर आहे