रुपया 94 पैशांनी सावरला

मुंबई – परकीय चलन बाजाराच्या प्रारंभी आज रुपया 94 पैशांनी वधारला. रुपया दर प्रती डॉलर 64.30 रुपयांवर आहे. शेअर बाजाराचा निर्देशांकाने 401.35 अंकाने उसळी घेतली. रुपया सावरल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.

रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून सूत्रे स्वीकारल्यापासून रुपयाच्या मूल्यात सुधारणाच होताना दिसत आहे. रिझर्व्ह बँकेने रुपयाच्या मूल्यात सुधारणा होण्यासाठी काही पावले उचलल्याने गुंतवणुकदारांमध्येही चैतन्य आले आहे.

मागील महिनाभरात रुपयाचे अवमूल्यन सातत्याने सुरूच राहिल्याने परिस्थिती चिंताजनक बनली होती. रुपयाचे अवमूल्यन होऊन तो 68 रुपयांवर पोचला होता. मात्र मागील चार दिवसांपासून रुपया सुधारत असल्याने सगळ्यांनाच दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा रुपयाचे मूल्य 65.24 एवढे होते. सोमवारी गणेश चतुर्थीमुळे बाजार बंद होते. आज सकाळी बाजार सुरू होताच रुपया 90 पैशांनी सावरून 64.30 वर आला आहे.