श्रीनगर – आगामी सरकार स्थापनेत लोकसभेत काँग्रेसच्या जागा कमी होतील, तर भाजप प्रभावी कामगिरी करू शकणार नाही त्यामुळे प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरेल. असे मत आज (सोमवार) संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) अध्यक्ष शरद यादव यांनी आज व्यक्त केले.
आगामी सरकार स्थापनेत प्रादेशिक पक्ष महत्त्वाचे – शरद यादव
अवामी नॅशनल कॉन्फरन्सच्या अध्यक्ष खालिदा शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर यादव यांनी हे मत व्यक्त केले. तिसर्या आघाडीमध्ये काश्मीरमधील पक्ष असतील का, या प्रश्नावर यादव यांनी सर्व पर्याय खुले आहेत असे सांगितले. आम्ही फारुख अब्दुल्ला आणि मुफ्ती मोहंमद सईद यांच्यासोबत काम केले आहे, असेही यादव म्हणाले.
