आता हस्ताक्षर सुधारण्यासाठी यांत्रिक हाताची मदत

लंडन – सुंदर अक्षर हा मनाचा आरसा आहे’ असे म्हटले जाते. सुंदर अक्षरामुळे आपली चांगली प्रतिमा समोरच्या व्यक्तीच्या मनात निर्माण होते. पण हे सुंदर अक्षर काढणे सर्वानाच शक्य होत नाही.  शास्त्रज्ञांनी एक यांत्रिक (यांत्रिक) हात तयार केला आहे. हा यांत्रिक हात मुलांना त्यांचे अक्षर सुंदर बनवण्यासाठी मदत करणार आहे.

 एक तर त्यासाठी कठोर सराव करावा लागतो म्हणजेच अक्षरे चांगल्या प्रकारे गिरवावी लागतात आणि तसे केल्यानंतरही अक्षर चांगले होईलच, असे सांगता येत नाही. मात्र, आता किमान भावी पिढीचे तरी अक्षर चांगले असण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांनी एक यांत्रिक (यांत्रिक) हात तयार केला आहे. हा यांत्रिक हात मुलांना त्यांचे अक्षर सुंदर बनवण्यासाठी मदत करणार आहे. लीडस् विद्यापीठ, ब्रॅडफर्ड इन्स्टिटयूट ऑफ हेल्थ रिसर्च आणि इंडियाना विद्यापीठातील संशोधकांनी हा यांत्रिक हात बनवला आहे. हा यांत्रिक हात लहान मुलांचे हात आणि मनगटावर विशेष लक्ष ठेवून त्यासंदर्भातील सूचना संगणकावर देतो. या यांत्रिक हाताची अमेरिकेतील प्रायमरी शाळेत चाचणी घेण्यात आली. त्या वेळी या हातांनी दिलेल्या सूचनेमुळे मुलांचे हस्ताक्षर सुधारण्यात मोठया प्रमाणात मदत झाली. त्यामुळे अनेक मुलांचे हस्ताक्षर सुंदर झाल्याचे दिसून आले. या चाचणीमध्ये हस्ताक्षर सुधारण्यासाठी मुलांना देण्यात आलेल्या पेनला हा यांत्रिक हात जोडण्यात आला होता. हा हात संगणकावर एका कम्युटर गेमप्रमाणे दिशा दाखवतो. त्यानुसार मुलांना आपल्या हाताची हालचाल करायची असते.

हस्ताक्षराचा सराव करताना हाताची व मनगटाची हालचाल करताना हा यांत्रिक हात पेन किती प्रमाणात खाली ओढायचे, कशी रेघ मारायची, पेनवरील दबाव याबाबत मार्गदर्शन करेल. त्यामुळे मुलांच्या हातामध्ये एक आत्मविश्वास येईल. मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्यानंतर यांत्रिक हाताकडून येणारे मार्गदर्शन हळूहळू कमी होईल व मुलांना स्वत:हून आपले सुंदर अक्षर काढण्याची सवय होईल. या प्रणालीचा वापर करून अमेरिकेतील ब्रॅडफर्ड येथील प्राथमिक शाळेतील पाच ते सात वर्षाच्या मुलांमध्ये ही चाचणी करण्यात आली. त्या वेळी 20 मिनिटांच्या सरावानंतर मुलांच्या अक्षरांमधील वेगळेपण आणि त्यांच्यात वाढलेला आत्मविश्वास दिसून आला.