
पुणे, – ज्या शेतकर्यांनी वखार महामंडळाकडे धान्य ठेवले आहे त्यांना त्यावर त्वरीत कर्ज मिळावे यासाठी महामंडळ व युको बॅक यांच्यात सामंजस्य करार नुकताच करण्यात आल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विश्वास भोसले यांनी दिली.

पुणे, – ज्या शेतकर्यांनी वखार महामंडळाकडे धान्य ठेवले आहे त्यांना त्यावर त्वरीत कर्ज मिळावे यासाठी महामंडळ व युको बॅक यांच्यात सामंजस्य करार नुकताच करण्यात आल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विश्वास भोसले यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हे राज्यभरातील आपल्या केंद्रावरून शेतकर्यांना माल साठवणुकीची सेवा उपलब्ध करून देते. मालाच्या साठवणुकीनंतर महामंडळाकडून शेतकर्यांना ज्या वखार पावत्या देण्यात येतात त्या पावत्यांच्या आधारावर युको बॐकेकडून शेतकर्यांना तत्काळ कर्ज मिळवण्यसाठीचा हा सामजंस्य करार करण्यात आला आहे. या करारावर युको बँकेच्या मुंबई सर्कल कार्यालायत स्वक्षर्या करण्यात आल्या. या प्रसंगी बँकेचे महाव्यवस्थापक बी. बी. सहाय यांच्यसह बॐकेचे व महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या सामजंस्य करारातंर्गत वखार महामंडळाच्या 170 साठवण केंद्रावरून जारी केलेल्या वखार पावतीवरून साठवण किमतीच्या 75 टक्के कर्ज युको बँकेच्या कोणत्याही शाखेतून तत्काळ उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकर्यांना आपल्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याचे लक्षात आले, तर तो माल विक‘ी न करता योग्य भाव मिळण्याची वाट पाहू शकतो. तसेच बाजारात मालाची योग्य किंमत येणार असल्यास महामंडळ शेतकर्यांना कळविणार आहे. त्यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली विकसीत केली आहे. याशिवाय महामंडळाने यापूर्वी बँक ऑम महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑम इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि देना बँकेशी करार केले आहेत. त्या अंतर्गत नाबार्डच्या नियमावलीनुसार शेतकर्यांना कर्ज उपलब्ध मिळू शकते, असे भोसले यांनी सांगितले.