वॉशिंग्टन – जगभरात संगणकावरील हेरगिरी करण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने (एनएसए) महासंगणकाचा वापर केला. यामुळे इंटरनेटवरील सांकेतिक क्रमांक उघड (क्रॅक) करता आले, असा खळबळजनक गौप्यस्फोट अमेरिका व इंग्लंडच्या वर्तमानपत्रांनी केला आहे.

जागतिक व्यापार, बॅँकिंग यंत्रणा, महत्त्वाची संवेदनशील माहिती, व्यापारी गुप्त माहिती, वैद्यकीय तपशील, इंटरनेटवरील संभाषण, दूरध्वनी संभाषण आदींसाठी लागणारे सांकेतिक क्रमांक एनएसएने क्रॅक’ केले. अमेरिकेच्या एनएसएसाठी काम करणारा कंत्राटी कर्मचारी एडवर्ड स्नोडेन याने उघड केलेल्या गुपितांमधील ही नवी माहिती या वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केली.
या सर्व कामगिरीसाठी एनएसएने विशेष महासंगणक वापरले. त्यामुळे अनेक सांकेतिक क्रमांक क्रॅक’ करता आले. यासाठी अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्यांचे साहाय्य घेतले. मात्र त्यांची नावे उघड केलेली नाहीत.
संगणक हॅक’ करण्यापूर्वी त्यावर एक संदेश पाठवला जायचा. तर एखाद्या संस्थेची संगणक यंत्रणा अभेद्य असल्यास जगातील सर्वात अनुभवी सांकेतिक क्रमांक तोडणा-या व्यक्तीस पाचारण केले जात होते. तो हार्डवेअर व सॉफ्टवेअरमधील दोष हुडकून संगणकात अलगद प्रवेश करायचा. एका दशकात एसएसएने अत्यंत आक्रमक मोहीम राबवत जगभरातील इंटरनेटवरील सांकेतिक क्रमांक क्रॅक’ केले, असे अहवालात नमूद केले. अमेरिकेला धोका असल्याने ही मोहीम राबवणे गरजेचे आहे, असे समर्थन एनएसएने केले.