शुद्ध देसी रोमान्स

लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापुर्वी वधु गायब झाल्याची घटना आपण असंख्य वेळा ऐकली आहे, बॉलिवुडच्या रजतपडड्यावर अनेक वेळा हा विषय मांडण्यात आला आहे. मात्र वधु ऐवजी वर पळाला अस प्रसंग कधी घडत नाही. मात्र बदलल्या काळाबरोबरच युवकांची मानसीकता बदलत आहे यामुळे लग्न करावे की नाही हा गोंधळ त्यांच्या मनात निर्माण होतो. मुलगी सुंदर, सुशील असली तरीही हा प्रश्‍न मुलाला सतावतो हाच धागा पकडला आहे मनिष शर्माने ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटात.

‘शुद्ध देसी रोमान्स’ ही कथा आहे रघु राम (सुशांत सिंग राजपूर) या जपुरमध्ये राहणार्‍या युवकाची. रघु हा सर्टिफाईड टुरिस्ट गाईड आहे तसंच तो एका स्टोअरमध्ये पार्टटाईम सेल्समनचंही काम करतो. कधी कधी तो ताऊजी’च्या (ऋषी कपूर) एजन्सीमध्येही काम करतो. लग्नाची तयारी करणं आणि लग्नाच्या दिवशी पैसे देऊन लग्नाच्या वेळी गर्दी जमवण्याचं काम ताऊजीची एजन्सी करते. राजस्थानच्या जयपूरमध्ये लव्ह मॅरेजला आपला विरोध दर्शवण्यासाठी अनेक लोक आपल्या नातेवाईकांच्या लग्नाला उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे ताऊजीचा धंदा चांगला सुरू आहे. रघुरामचे लग्न ताराशी (वाणी कपूर) ठरलेले आहे.

यामध्येही ताऊजी चांगले शिकले-सवरलेलं वर्‍हाड सप्लाय करतात. रघुरामचा लग्नावर आणि कमिटमेंटवर अजिबात विश्वास नाही त्यामुळे रघुराम त्याच्या भावी वधूला लग्न मंडपात सोडडूपन जातो. यावेळी लग्नाच्याच दिवशी रघुरामची ओळख त्याची बहिण म्हणून लग्नात सहभागी झालेल्या गायत्रीशी (परिणीती चोप्रा) त्याची होते. लग्नातून पळळून गेलेल्या रघुची पुन्हा गायत्रीशी भेट होते. आणि जयपूरमध्ये गायत्री आणि रघु यांचा लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये संसार आणि ‘शुद्ध देसी रोमान्स’ सूरू होतो.

मनिष शर्मा दिग्दर्शित ‘शुद्ध देसी रोमान्स’ची कथा आजच्या पिढीतील अशा तरुणांची आहे, जे मॉर्डन तर आहेत मात्र त्यांचे मन देसी आहे. या कथेत आकर्षण, प्रेम आणि नैराश्य हे सर्वकाही आहे. ही कथा प्रेम करणा-या अशा काही तरुणांची आहे, जे समाजातील नियमांना मानत नाहीत आणि केवळ आपल्या मनाच ऐकतात आणि तेच करतात. मात्र असं करणं वाटतं तितकं सोपं नाही. चित्रपटात लग्न, कमिटमेंट या गोष्टींवर अतिशय चांगल्या पद्धतीनं चर्चा घडून येताना दिसते.

’बँड बाजा बारात’ आणि ’लेडीज वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटांचे दिग्दर्शन मनीष शर्माने यापुर्वी केले आहे. ‘शुद्ध देसी रोमान्स’ मध्ये लिव्ह इन रिलेशनशिपसारख्या बोल्ड विषयाला त्याने मनोरंजनात्मक पद्धतीने दिग्दर्शकाने सादर केले आहे. जयदीप साहनी यांची कथा आणि संवाद यामधुन आपल्याला नविन काहीतरी ऐकल्याच समाधान मिळते. लग्न आणि लिव्ह इन यांवर वेगवेगळे विचारही कानी पडतात. बॉलिवुडमध्ये अनेक रोमँईक चित्रपट येतात त्यात हा न बसणारा वेगळ्या पठडीतला चित्रपट आहे याची जाणि दिग्दर्शक आपल्याला पहिल्या काही मिनिटातच जाणिव करून देतो.

या चित्रपटात कलाकारांची केमेस्ट्री भन्नाट जुळली आहे. परिणीती चोप्रा आणि सुशांत सिंग राजपुत यांनी आपल्या भुमीकांना पुरेपुर न्याय देत दिग्दर्हकाचा विश्‍वास साथ र्ट्ःअरवला आहे. वाणी कपूरचा हा पहिलाच चित्रपट आहे पण, तिनंही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिलीय. ऋषी कपुर यांनी साकारलेले ताऊजी आपली छाप सोडुन जातात. गुलाबी शहर म्हणुन ओळखल्या जाणार्‍या जयपुरमध्ये चित्रपटटाचे सर्व शुटींग झाले आहे. जयपूरचं चित्रण एवढ्या सुंदर रितीनं करण्यात आलंय की गुलाबी थंडीत हे गुलाबी शहर एकदा तरी पहायला ह्हव अस आपल्याला वाटत. तरूणाईच्या मनाचा वेध घेत बोल्ड विषयाची नेमकी मांडणी असलेला रोमान्सचा देसी अंदाज एकदा तरी चित्रपटगृहात जाऊन अनुभवयाला हवा.

चित्रपट – शुद्ध देसी रोमान्स
निर्माता – आदित्य चोप्रा
दिग्दर्शक – मनीष शर्मा
संगीत – सचिन -जिगर
कलाकार – सुशांत सिंग राजपूर, परिणीती चोप्रा, वाणी कपूर, ऋषी कपूर

रेटिंग – * * *