पुणे : भारताला परवडणारा, पुरेसा आणि सातत्याने उर्जा पुरवठा होणे हे आगामी काळातील सर्वात मोठे आव्हान असून देशाचा विकास त्यावर अवलंबून राहील असा अंदाज प्राईस वॉटरहाउस कुपर ( पी डब्लू सी ) आणि ङ्गेडरेशन ऑङ्ग इंडियन चेंबर ऑङ्ग कॉमर्स यांनी केलेल्या उर्जा सुरक्षितता विषयक पाहणीत व्यक्त केला आहे.
ऊर्जा स्रोतांचा कार्यक्षम वापर हे देशापुढील आव्हान
ङ्गोर्जिंग टाइज : सिक्युअरिज एनर्जी सप्लाय ङ्गोर स्ट्रोन्गर इकोनॉमी हा अभ्यास अहवाल दोन्ही संस्थांनी संयुक्तरीत्या तयार केला आहे. उपलब्ध स्रोतांचा कार्यक्षम वापर, इतर देशांचे सहकार्य आणि त्यात येणारे अपेक्षित अडथळे या अंगाने हा अभ्यास करण्यात आला आहे.
जगात उर्जेचा वापर २०११ च्या ( २.४ ) तुलनेत २०१२ मध्ये केवळ २.१ टक्के वाढला. भारताचा ऊर्जेचा वापर ५.४ तर चीनचा ७.७ टक्के वाढला. भारत जगातील चवथ्या क्रमांकाचा उर्जा वापर करणारा देश असून या देशात इंधनाचा दरडोई वापर ४५६ किलो आहे. भारताची मागणी २०३५ मध्ये तिप्पट होणार आहे.
तेल, वायू आणि कोळसा याचा सर्वाधिक वापर भारत करत असल्याने त्यावर असलेले अवलंबित्व कमी करणे हे मोठे आव्हान आहे असे अहवालात म्हटले आहे. २०३१ -३२ मध्ये देशाची इंधन आयात ९० टक्के होईल असा अंदाज आहे.
निर्यात प्रमाण चांगले असले तरी त्यातील ५६ टक्के उत्पन्न आयातीवर खर्च होते ही बाब अधिक गंभीर आहे असे त्यात म्हटले आहे. तेल निर्यातदार देशांशी असलेले राजकीय संबंध दृढ करणे हाही एक चांगला पर्याय असून त्याकडे धोरण कर्त्यांनी लक्ष द्यायला हवे असे त्यात म्हटले आहे.
