पुणे, – :अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद म्हणजे लेखक आणि वाचक यांच्यामधील ह्रदयनामा असतो. त्यामुळे या निवडणुकीत कोणत्याही प्रकारची सत्ता मिळविण्याची स्पर्धा, मतदारांना भुलावणारे जाहिरनामे नसतात, अशी भावना अध्यक्षपदाचे उमेदवार आणि ज्येष्ठ कवी म.मु शिंदे यांनी रविवारी येथे व्यक्त केल्या.
संमेलनाध्यक्षपद हा हृदयनामा: फ मु शिंदे
रंगमभूमी परिनिक्षण मंडळाच्या पुणे केंद्राच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहण्याची भुमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, संमेलनाचे अध्यक्षपद हे सन्मानाचे असते. त्यामध्ये कुठलीही सत्ता किंवा कुठलाही जाहीरनामा नसतो. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणी कोणाचा प्रतिस्पर्धी नाही आम्ही मक्त मराठीचे प्रतिनिधी आहोत. जय- पराजय होतच असतात. गेली अनेक वर्षे साहित्याची सेवा करीत आहोत. कार्य अखंडपणे चालू राहील हे जिवितकार्य असते.
निवडणुकी विषयी बोलताना ते म्हणाले, प्रत्येक मतामागे मन असते. मतपूर्वक आणि मनःपूर्वक हा सन्मान असतो. सासवड आणि माझा जुना स्नेह असून 12 वर्षापूर्वी आचार्य अत्रे साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मी सांभाळलें आहे. माझे आत्तापर्यंत 27 काव्यसंग्रह प्रकाशित झाले आह ेत. त्यातील काही काव्यसंग्रह गंभीर विषयावरील आहेत,असेही त्यांनी सांगितले. सध्याच्या साहित्य संमेलनाला जत्रेचे स्वरुप आले असून त्यातील जाणीवा कमीहोत आहेत. म्हणूनच छोटी संमेलने झाली तर अधिक संवादी होतील असेही शिंदे यांनी यावेळी नमूद केले.
