ब्युनस आयर्स – आयओसीच्या 125व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत जपानची राजधानी असलेल्या टोकियो शहराला 2020 च्या ऑलिंपिक स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. शनिवारी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीतर्फे (आयओसी) टोकियोचं नाव जाहीर करण्यात आले.

दुसर्यांदा टोकियोने ऑलिंपिक स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळविला आहे. यापूर्वी 1964 मध्ये टोकियोत ऑलिंपिक स्पर्धा झाली होती. आयोजनाच्या शर्यतीत असलेल्या इस्तंबूल आणि माद्रिद शहरांनी टोकियोने पिछाडीवर टाकलं. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास हा निर्णय जाहीर करण्यात आला.
ऑलिम्पिक यजमानपद देण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर जपानची राजधानी टोकियोत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.