नवी दिल्ली – सातशे रुपये चोरल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आरोपीला कोर्टाने सात वर्षांची शिक्षा सुनावलीय. दिल्ली सत्र न्यायालयानं दिलेला निकाल हायकोर्टाने कायम ठेवला आहे.
चोरी सातशे रुपये, शिक्षा 7 वर्ष!
नोवेम्बर 2009मध्ये सागर आणि अल्लाउद्दीन नावाच्या दोन तरुणांनी दिल्लीतल्या खजुरी खास पोलीस स्टेशनजवळ एका व्यक्तीला जखमी करुन सातशे रुपये चोरले होते. त्यावेळी सागरकडून एक सुरा, एक देशी पिस्तुल आणि सातशे रुपये पोलिसांनी जप्त केले होते.
दिल्ली सत्र न्यायालयाने सागर याला सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. तर पुराव्यांअभावी अल्लाउद्दीनची निर्दोष मुक्तता केली. मात्र सत्र न्यायालयाच्या निर्णया विरोधात सागरनं हायकोर्टात अपिल केले. आता हायकोर्टानंही सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवत, सागरला सात वर्षांची शिक्षा सुनावलीय.
आरोपीचं अपिल फेटाळून लावत हायकोर्टाचे न्यायाधिश एस. पी. गर्ग यांनी निकाल कायम ठेवला. आरोपींनी पीडित व्यक्तीस जखमा केल्या होत्या, त्यामुळं शिक्षा कायम ठेवण्यात आल्याचे कोर्टाने म्हटले आहे.
