वॉशिंग्टन – अमेरिकेतील उत्तर कॅलिफोर्नियातील न्यायालयात नामवंत वकील सुनील कुलकर्णी यांची न्यायाधीशपदी नेमणूक झाली आहे. या पदावर नेमणूक होणारे कुलकर्णी हे दक्षिण आशियातील पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. कॅलिफोर्निया विद्यापीठात वरिष्ठ वकील म्हणून काम करणारे कुलकर्णी यांची सांता क्लारा काउंटीचे गव्हर्नर जेरी ब्राऊन यांनी सुपिरियर न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक केली.
अमेरिकन न्यायालयाच्या न्यायाधीशपदी सुनील कुलकर्णी
यूसी बर्कले विद्यापीठातून कुलकर्णी यांनी बीएस केले. तर कॅलिफोर्निया विद्यापीठातील हेस्टिंग्ज कॉलेज ऑफ लॉमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. कॅलिफोर्नियातील पूर्व जिल्हा न्यायालयात न्यायाधीश ऑलिव्हर वॅँगर यांच्या हाताखाली कायदेविषयक कारकून म्हणूनही त्यांनी काम केले होते. गव्हर्नरांच्या कार्यालयातून दूरध्वनी आल्यानंतर मला आनंद वाटला.
अमेरिकेत दक्षिण आशियाई नागरिक अधिक संख्येने कायद्याच्या क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करत आहेत, असे कुलकर्णी यांनी सांगितले.कुलकर्णी यांचा जन्म लॉस एंजेलिस येथे झाला असून कॅलिफोर्नियातील पालो आल्टो भागात त्यांचे वास्तव्य आहे.
