गृहखाते अपयशी ठरल्याने डॉ दाभोळकर तपास सीबीआयकडे सोपवाˆ: पतंगराव

पुणे, – गृहखात्याच्या कामकाजाबाबत एकूणच प्रचंड नाराजी असून सध्या सर्वच पातळ्यांवर हे खाते सपशेल हरले आहे, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करण्यात गृहखाते हतबल ठरले असून जमत नसेल तर त्यांनी हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरीत करावे, अशी सडेतोड टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी आज येथे केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या गृहखात्यावर तोंडसूख घेत एक प्रकारे त्यांनी आपल्याच जिल्ह्यातील आर. आर. पाटील यांनाच लक्ष्य केल्याचे मानण्यात येत आहे.

नियोजित कार्यक्रमासाठी पुण्यात आलेल्या डॉ. कदम यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. अशी सणसणीत टीका त्यांनी केली. गृहखाते परिणामकारक रित्या चालविलेच जात नसल्याची टीकाही त्यांनी केली. डॉ. दाभोलकर यांची हत्या होऊन 18 दिवस उलटून गेले आहेत. अद्यापही या प्रकरणाचा तपास लागत नसून आरोपी पोलिसांना सापडत नाहीत. हे गृहखात्याची सपशेल हार असून पोलीस हतबल झाले आहेत. त्यांना श्‍नय होत नसेल, तर डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभेसाठी पुण्यातून कलमाडी यांना उमेदवारी देण्याचा प्रश्‍नच येत नाही. त्यांना काँग्रेसमधून काढून टाकण्यात आलेले आहे. सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असलेले शहर अशी पुण्याची ओळख आहे. त्यामुळे या शहराला साजेसाच उमेदवार असण्याची गरज आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यावर ह्नक सांगू शकत नाही, असे डॉ. कदम यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना स्पष्ट केले. विश्‍वजीत कदम यांच्या उमेदवारीबाबत विचारले असता, ते राहूल गांधी यांच्या गटातील असल्याने तेच याबाबतचा निर्णय घेतील, असे डॉ. कदम यांनी सांगितले. तिकट वाटपामध्ये 40 ट्नके तरूण, 30 ट्नके मध्यमवयीन आणि 30 ट्नके ज्येष्ठ नेते अशी विभागणी केली जावी, अशी शिमारस आपण पक्षाकडे केली आहे, असेही त्यांनी सांगितले.