नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून चीनच्या सैनीकांनी ‘लाइन ऑफ अॅ क्चुअल कंट्रोल’ येथे केलेल्या घुसखोरीच्या अहवालावरून शुक्रवारी लोकसभेत गदारोळ उडाला. चीनने ‘लाइन ऑफ अॅलक्चुअल कंट्रोल’ येथील जवळपास ६४० किलो मीटर जमीन बळकावली असून तेथे वाहतूकीसाठी रस्ता बांधला आहे. या परिसरात पाहणी करण्यास चीनकडून भारताला मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती नुकतीच समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर खासदारांनी लोकसभेत गोंधळ माजवला. समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंग यादव यांनी हा मुद्दा सर्वप्रथम उचलून धरला. गेल्या १४ वर्षांपासून मी या मुद्याचा पाठपुरावा करत आहे, मात्र सरकारने याप्रकरणी कोणतीही ठोस कारावी केली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
संरक्षण मंत्री देशाच्या सीमा सुरक्षित राखू शकत नाहीत. त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही अधिकारी नाही, असा टोलाही त्यांनी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांना लगावला. दरम्याफन, याप्रश्नाणवर लोकसभेत संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांनी उत्तदर देणे अपेक्षीत असून सर्वचजण त्यांच्या उत्तराची वाट पाहात आहेत.