बालिका वधू या छोटया पडद्यावरील मालिकेत पूर्वी आनंदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रत्यूषा बॅनर्जी हिला तिच्या बॉयफ्रेंडने मारहाण केली. मारहाण झाल्यानंतर आनंदीने आपला बॉयफ्रेंड मकरंद मल्होत्रा याच्याविरोधात पोलिसांत मारहाणीची तक्रार दाखल केली आहे. मकरंद याने आपल्याला मारहाण केली तसेच आपल्या घरातील व्यक्तींशी असभ्य वर्तन केले आहे असे तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, याबाबत प्रतीक्रिया देण्यास टाळाटाळ करणा-या मकरंदने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
मुंबईच्या ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये प्रत्युषाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे बालिका वधू या मालिकेत पूर्वी आनंदीची भूमिका साकारणारी प्रत्युषा सध्या कोणत्याही मालिकेत दिसत नाही. दीड वर्षापूर्वी या टीव्ही मालिकेच्या सेटवर प्रत्युषा व मकरंदची भेट झाली होती व लवकरच ते दोघे एकत्र दिसू लागले. दोघांच्या प्रेमप्रकरणाची चर्चाही चांगलीच रंगली होती.
अनेक दिवसापासून छोट्या पडद्यावर न दिसलेली प्रत्युषा या प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मकरंदने आपल्याला मारहाण केली अशी तक्रार तिने केल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी तक्रार दिली आहे. दरम्यान, याबाबत प्रतीक्रिया देण्यास टाळाटाळ करणा-या मकरंदने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.