जोधपूर- जोधपूर कोर्टाने जामीन अर्ज फेटाळून लावल्या,ने आसाराम बापू जामीनासाठी आता हायकोर्टात धाव घेणार आहेत. अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले आसाराम बापू शुक्रवारी ते हायकोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.

आसाराम बापूंना जामीन मिळाल्यास तपासावर त्याचा परिणाम होईल, असे सरकारी पक्षाने कोर्टात म्हटल्यानंतर बापूंना जामीन अर्ज फेटाळण्यात आला. जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मनोज कुमार व्यास यांनी दोन दिवस आसाराम बापूंच्या वकिलांचेही म्हणने ऐकून घेतल्यांजनंतर हा निर्णय दिला.
आसाराम बापूंना शनिवारी मध्यरात्री इंदूर येथील आश्रमातून पोलिसांनी अटक केली होती. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.प्राथमिक माहिती अहवाल, वैद्यकीय अहवाल आणि संबंधित मुलीने दिलेला जबाब यांतील माहितीबाबत आसारामबापू यांचे वकील के. के. मेनन यांनी आक्षेप उपस्थित केले होते. मात्र, त्यांचं म्हणणे न्यायाधीशांनी फेटाळले.