सुष्मिता सेन करणार पुनरागमन

बॉलिवुड अभिनेत्री सुष्मिता सेन यावर्षी पुनरागमन करणार आहे. सुष्मिता एक वुमन ऑरिएंटेड सिनेमातून कमबैक करणार आहे. अजूनन तरी तिने हा सिनेमा साइन केला नाही. आगामी काळात तिचा तसा प्लैनिंग सुरू आहे.

याबाबत बोलताना सुष्मिता म्हणाली, ‘इंग्लिश विंग्लिश’ सिनेमा सारखा दमदार रोल मिळाला तर तर ती खुशीने हा रोल स्वीकारेल. सुष्मिताचा शेवटचा सिनेमा २०१० मध्ये ‘नो प्रॉब्लम’ हा होता. त्यानंतर सुष्मिताने तीन वर्ष ब्रेक घेतला आहे. सुष्मिताने सिनेमात या काळात कसलाच रोल केला नाही.

केवळ इवेंट्स आणि फैशन शोमध्ये ती झाळकत राहिली. रैंपची ब्यूटी म्हेणून सुष्मिताने मोठी लोकप्रियता मिळवली आहे. एका ज्वेलरी वीकमध्ये सुष्मिता फेमस झाली होती. सुष्मिता सध्या फैमिली सोबत तिचा अनमोल वेळ घालवीत आहे. त्यामुळेच आता सुष्मिता पुनरागमन करणार आहे.