
कौट्री- पैशांची तंगी माणसावर काय काय परिणाम करते याची जाणीव सर्वसामान्यांना असते. वारविक विद्यापीठातील संशोधक व अर्थशास्त्रज्ञ आनंद मणी आणि त्यांच्या सहकार्यांनी या संदर्भात केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की पैशांची तंगी माणसाला केवळ लाचारच बनवित नाही तर त्याच्या मेंदूची कार्यक्षमताही ती कमी करते. आर्थिक तंगीमुळे माणसाची तार्किक क्षमता घटते इतकेच नव्हे तर त्याच्या बुद्धयांकही 13 अंकांपर्यंत कमी होतो असेही या संशोधनातून दिसून आले आहे.
