
राळेगणसिद्धी – भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे प्रणेते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना आज शनिवारी जिवे मारण्याच्या धमकीचे निनावी पत्र आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अण्णा हजारे यांना राळेगणसिद्धीत हे निवावी पत्र आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या पत्रात, अण्णा भारतात इजिप्तसारख्या सशस्त्र क्रांतीची गरज आहे. तुमच्या मरणानंतरही हे राजकारणी लोकपाल विधेयक मंजूर करणार नाहीत. तुम्ही देशात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी याला पाठिंबा द्या, नाही तर तुमचाही दाभोळकर करू , असे म्हटले आहे. या पत्राची चौकशी पोलिस करणार असून अण्णांच्या सुरक्षेत वाढ करणार असल्याचे समजते.नुकतेच अंधश्रद्धानिर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली त्यामुळे समाजसेवकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे
