
वॉशिंग्टन : सिरियावर मर्यादीत प्रमाणात का होईना लष्करी कारवाई करण्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अखेर जाहीर केले. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत रशिया अडथळा आणण्याची शक्यता असल्याने अमेरिका संयुक्त राष्ट्रसंघाची परवानगी घेण्याच्या भानगडीत पडणार नाही, असे ओबामांनी स्पष्ट केले.
