हल्लेखोरांचे छायाचित्र सात सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमध्ये कैद

पुणे, – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणारे दोन हल्लेखोर एकूण सात सीसीटीव्ही कॅमेर्‍यांत दिसत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी एकूण 110 कॅमेर्‍यातील फूटेज तपासलें हल्ल्यापूर्वी हल्लेखोर आसपासच्या परिसरात फिरत होते. प्रत्यक्ष गोळ्या झाडल्यावर ते शिंदेपाराच्या दिशेने निघून गेल्याचेही समोर आले आहे; मात्र तेथून पुढे त्यांचा मागमूस लागत नाही, असे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी घटनास्थळ आणि आसपासच्या परिसरातील एकूण 110 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांतील फूटेज पोलिसांना मिळाले आहे. त्या सर्वफूटेजची पडताळणी पूर्ण झाली असून एकूण सातफूटेजमध्ये हल्लेखोरांच्या हालचाली टिपल्या गेल्या आहेत. मात्र या सातहीफूटेज अस्पष्ट असल्याने तपासात अडथळे येत आहेत. ते फूटेज तांत्रिकदृष्ट्या तपासणी करण्यासाठी लंडनला पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल आल्यावर पोलिसांना आणखी मदत होईल, असे भामरे यांनी स्पष्ट केले. गेल्या दहा ते बारा दिवसांत पोलिसांना अनेक प्रकारच्या बाबी कळल्या आहेत. त्यांच्या आधारे तपासाच्या आधारे आम्ही योग्य मार्गावर असून लवकरच या प्रकरणाचा छडा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.