पुणे, – मराठी नाटक व चित्रपटांना प्रोत्साहान देण्यासाठी मिक्ता पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. या पुरस्कारा निमित्त आयोजीत चित्रपट, नाट्य महोत्सवास प्रेक्षकांनी प्रतिसाद देऊन त्याचे चळवळीत रूपांतर करावे असे अवाहन प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी रविवारी केले.
म्महाराष्ट्र कलानिधी, म्हैसकर मिफ्ता नाट्य – चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मांजरेकर बोलत होते. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेता सचिन खेडेकर, सुशांत शेलार, अनिरूद्ध देशपांडे, अरविंद चाफळकर, प्रसाद आपटे, सोहम लेले, गौरव सोमाणी आदी यावेळी उपस्थित होते.
मांजरेकर म्हणाले, मिफ्ता ही शएक चळवळ आहे, यामागे कोणतीही व्यवसायीकता नाही. या महोत्सवाच्या माध्यमातुन तंत्रज्ञ, बॅकस्टेज आर्टीस्ट यांच्यासाठी सहायता निधी उभारण्यात येत आहे त्यात योग्दान देण्याचे अवाहन त्यांनी यावेळी केले.
खेडेकर म्हणाले, कलावंतानी मेहनतीने तयार केलेल्या चित्रपटांना प्रोत्साहान देण्याबरोबरच त्या चित्रपटांचे गुणात्मक परिक्षण हा या पुरस्कारा मागील हेतु आहे. चंद्रकांत कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले तर सुशांत शेलार यांनी आभार मानले.